शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लोकसभेत उदयनराजेंना दणका, आता राष्ट्रवादी साताऱ्यात दोन्ही राजेंना एकाचवेळी पराभूत करणार,रणनीती तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 4:24 PM

Satara News: सातारामधील नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे (Shivendrasinghraja Bhosale) या भाजपाच्या दोन राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

सातारा - राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या उदयनराजेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१९ च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव केला होता. श्रीनिवास पाटील यांच्याकडून झालेल्या या पराभवाची सल अद्यापही उदयनराजेंच्या मनात आहे. दरम्यान, आता सातारामधील नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या भाजपाच्या दोन राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी साताऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच शरद पवार यांनीही दोन्ही राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा आहे. (Udayanraje Bhosale defeated in Lok Sabha, now NCP will make strategy to defeat both Rajes at the same time in Satara )

सातारा नगरपालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. त्याच्याच पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीपक पवार यांनी सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल उभे करण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला. शरद पवार यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मक मत प्रदर्शित केले आहे. तुमच्या प्रस्तावाबाबत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी दीपक पवार यांना सांगितले.

राष्ट्रवादीने साताऱ्यामध्ये याआधी कधीही पक्षीय पॅनेल दिला नव्हता. मात्र यावेळी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन दोन्ही राजेंना साताऱ्यात आव्हान द्यावे. तसे केल्यास उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना आपण पराभूत करू शकतो, असा विश्वास दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे.  

दुसरीकडे सध्या भाजपात असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात तितकेचे सख्य नाही आहे. विविध कारणांवरून त्यांच्यात खटके उडत असतात. दरम्यान, आगामी नगरपालिका निवडणुकीतही ते एकक्र येण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या दोन्ही राजेंमधील या मतभेदांचाही राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले