शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:47 AM

राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. 

सातारा : आज सकाळी शरद पवार आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. गेल्या काही काळापासून उभयतांत 'कॉलर उडविण्यापर्यंत' वक्तव्ये गेली होती. यावेळी काय चर्चा झाली याबाबतचे सांगणे उदयन राजेंनी टाळले असले तरीही सूचक विधान केले आहे.

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काही प्रमाणात वितुष्ट निर्माण झाले होते. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना उदयन राजे सोडून इरत सर्वांनी पवार यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष साताऱ्यावर केंद्रीत झाले होते. आज उदयन राजेंनी पवार यांनी भेट घेतली. 

यावेळी जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. याबाबत उदयन राजेंना विचारले असता त्यांनी पवार यांनी आपल्याला कडकडून मिठी मारल्याचे सांगितले. 'तुम्ही आमचेच आहात. नंतर बोलू. मी पण सांगितलं. कसं आहे, राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. 

गाडीत बसण्यास गेले अन्...चर्चेतून बाहेर पडताना उदयन राजेंनी चुकुन शरद पवार यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. मात्र, चालकाकडे पाहून त्यांना ही आपली गाडी नसून पवार साहेबांची असल्याचे कळताच माघारी परतले. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मात्र, उदयन राजेंनी 'साहेबांची गाडी आहे. एवढं काय...कलर एकच आहे. वाटले आपली गाडी.' असे म्हणत वेळ मारून नेली. 

शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या दोन्ही राजांदरम्यान असलेला विसंवाद दूर करण्यासाठी पुण्यात समेट घडवून आणला होता. यावेळी दोन्ही राजांनी पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. मात्र, ही शिष्टाई यशस्वी झाल्याचे वाटत असतानाच पुन्हा वर्चस्व वादाने उसळी घेतली व साताऱ्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर