शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

दुचाकी धुताना पाय घसरून गुरसाळेत दोन तरुण गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:06 IST

पंढरपुरातील भीमा नदीजवळील प्रकार; उजनी आणि वीर धरणातून भीमेत विसर्ग सुरू

ठळक मुद्देउजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरूगुरसाळे बंधाºयावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती़स्वप्नीलचा पाय घसरला अन् वाहत जाताना पाहून त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्ष्मणही पाण्यात वाहून गेला

पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील बंधाºयावर दुचाकी धुत असताना एकाचा पाय घसरला अन् तो वाहून जाताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही भीमा नदीत वाहून गेला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुरसाळे बंधाºयावर घडली.  लक्ष्मण सीताराम खंकाळ (वय १९), स्वप्नील सीताराम शिंदे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत.

उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे़ शनिवारी गुरसाळे बंधाºयावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास बंधाºयावर लक्ष्मण आणि स्वप्नील हे दोघे मित्र लक्ष्मणची दुचाकी धुत होते़ दरम्यान, प्रथम स्वप्नीलचा पाय घसरला अन् वाहत जाताना पाहून त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्ष्मणही पाण्यात वाहून गेला़ याबाबतची माहिती गुरसाळे पोलीस पाटलांनी तालुका पोलीस ठाण्यास दिली.

घटनास्थळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस निरीक्षक अनिल अवचर दाखल झाले़ तहसीलदारांनी त्वरित नगरपरिषदेच्या यांत्रिक बोट आणि होड्या मदतीसाठी मागविल्या़ शिवाय देगाव येथील काही स्वीमरही त्यांचा शोध घेत आहेत.

निराधार लक्ष्मण वाहून गेल्याने हळहळलक्ष्मण खंकाळ याचे वडील लहान असतानाच वारले तर गेल्यावर्षी आईचे निधन झाले. त्यामुळे तो आजीकडे राहत होता़ तो गावातीलच एका दूध संकलन केंद्राकडे दूध संकलन करून देण्याचे काम करीत होता़ शिवाय पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बीएच्या प्रथम वर्षात शिकत  होता. शिक्षणासाठी पैशाची अडचण निर्माण व्हायची म्हणून आणि आजीला सांभाळण्यासाठी म्हणून तो दूध संकलनाचे काम करीत असे़ निराधार लक्ष्मण वाहून गेल्याचे कळताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्नीलही मंडप कॉन्ट्रॅक्टरकडे मजुरीची कामे करीत होता.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरriverनदीAccidentअपघातwater shortageपाणीकपात