शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठी दोन विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: November 13, 2015 00:24 IST

दिवाळीच्या सुटीनंतर पुण्याला जाण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या. खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही तीन हजारावर पोहोचले.

नागपूर : दिवाळीच्या सुटीनंतर पुण्याला जाण्यासाठी सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या. खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही तीन हजारावर पोहोचले. त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षायादी पाहून नागपूर-पुणे मार्गावर दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.विदर्भातून अनेक विद्यार्थी आणि नोकरदार पुण्यात शिकायला, नोकरीनिमित्त राहतात. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते परत येतात. परंतु या काळात पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात आरक्षण मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे दरम्यान सुपरफास्ट रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२१८ नागपूर-पुणे स्पेशल रेल्वेगाडी १३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२१७ पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस पुण्यावरून १४ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एक एसी टु टायर, ७ सेकंड क्लास स्लिपर चेअरकार, ७ जनरल सेकंड क्लास, २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०१२२३ नागपूर-पुणे एक्स्प्रेस सुपरफास्ट रेल्वेगाडी नागपूरवरून १६ नोव्हेंबरला सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२२४ सुपरफास्ट एक्स्प्रेस १७ नोव्हेंबरला पुण्यावरून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एक एसी टु टायर, एक एसी थ्री टायर, १२ स्लिपर क्लास, २ जनरल सेकंड क्लास, २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. (प्रतिनिधी)