पुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 13:38 IST2018-04-20T13:38:10+5:302018-04-20T13:38:10+5:30
चिंचवडमध्ये दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींवर दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे: दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार, गुड टच-बॅड टच शिक्षणामुळे प्रकार उघडकीस
पिंपरी- चिंचवडमध्ये दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींवर दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणारी मुलंही अल्पवयीन असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, या दोन्ही मुलांना अजूनही अटक झालेली नाही.
दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची ही घटना त्या दोघींना शाळेत मिळालेल्या ‘गुड टच आणि बॅड टच’च्या माहितीमुळे समोर आली. शाळेत शिक्षिकेकडून यासंदर्भातील माहिती मिळत असताना मुलीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती शिक्षिकेला दिली. शिक्षिकेने हा प्रकार पीडित मुलीच्या आईला सांगितला. मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे या घटनेबद्दल विचारणा करा, असं पीडित मुलींच्या आईला शिक्षिकेने सांगितलं. यानुसार आईने दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे घटनेबद्दल विचारणा केली. आईने विचारल्यावर त्या दोघी मुलींने त्याच्याच परिसरात राहणीर दोन मुलं अत्याचार करत असल्याचं सांगितलं. 14 आणि 16 असं या दोन्ही मुलांचं वय असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत.