शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Tunisha Sharma: लव्ह जिहादचा अँगल निघाला तर...तुनिशा आत्महत्या प्रकरणात आमदार राम कदमांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:07 IST

Tunisha Sharma: तुनिशाचा कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

Tunisha Sharma: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या मृत्युमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. तुनिशा हिने तिच्या शोच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्याच केली की तिचा घातपात झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तुनिशाच्या आईने तिचा मित्र शिझान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिझानला अटक केली आहे.

राम कदम काय म्हणाले?तुनिशा शर्माने टीव्ही मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवरच तिचा मित्र शिझान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. तुनिशाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शिझान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशा डिप्रेशनमध्ये होती. यामुळे ती अनेकदा डिप्रेशनच्या गोळ्या घेत असे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. मुलीच्या कुटुंबीयांना नक्कीच न्याय मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. लव्ह जिहादचे अँगल निघाले, तर त्या बाजूनेही तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

लव्ह जिहाद अँगल?तुनिशा आत्महत्या प्रकरणात आता लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर नक्कीच चौकशी केली जाईल, असे भाजपचे आमदार राम कदम यांचे म्हणणे आहे. तुनिशाच्या आत्महत्येमागील कारण शिझान खानसोबतचे ब्रेकअप असल्याचे सांगितले जात असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तुनिशाच्या आईनेही सांगितले की, शिझानमुळेच तुनिशा खूप नैराश्यात होती.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काय

पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तुनिशा शर्माचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरल्याने तुनिशा हिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर अन्य कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तुनिशा हिने आत्महत्या केल्यानंतर ती गर्भवती असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र ती गर्भवती असल्याची बाब पोलीस सूत्रांनी फेटाळून लावली आहे.

टॅग्स :Ram Kadamराम कदमTelevisionटेलिव्हिजनbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारी