शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खरी सत्ता ‘बारामती’चीच!

By admin | Updated: September 30, 2015 02:29 IST

राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली, तरी खरे सत्ताधारी ‘बारामती’करच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते,

अकोला : राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली, तरी खरे सत्ताधारी ‘बारामती’करच असल्याचा उपरोधिक टोला शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते, माजी आमदार वामनराव चटप यांनी अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.‘विदर्भ मिळवू औंदा’ अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. त्यानिमित्ताने विदर्भात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती त्यांनी दिली. या वेळी बोलताना माजी आमदार चटप यांनी राज्य शासनाच्या कामावर ताशेरे ओढतानाच विदर्भातील पुत्र राज्यातील सत्ताधारी असताना विदर्भावर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, वीजमंत्री, आदिवासी विभागाचे मंत्री विदर्भातील असताना पुरवणी अर्थसंकल्पात यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांचा उल्लेखही नाही. विदर्भात ५५00 हजार मेगावॉट वीज निर्मिती होत असताना येथील शेतकरी वीज जोडणीसाठी आत्महत्या करतो आहे. दुसरीकडे मेट्रो सिटीच्या नावाखाली मुंबई-पुण्यात झीरो लोडशेडिंग होते, असेही चटप म्हणाले.