The true guru of Shivrai is Saint Tukaram Maharaj and Jijau Mata | संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

ठळक मुद्देवढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केली टीका

कोरेगाव भीमा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवरायांचे गुरू हे स्वामी रामदास हे होऊच शकत नसल्याचे विधान केले होते. त्या विधानाचा संदर्भ घेत भाष्य करताना शिवरायांचे खरे गुरू हे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब याच आहेत, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. संभाजीराजे म्हणाले की, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याच्या वंशजासंदर्भात पुरावे मागितले. भोसले यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल काय पुरावे द्यायचे? आमचे छत्रपतींचे घराणे आहे. तोंडात येईल ते काही बोलून चालत नाही. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. 
वढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संभाजी महाराज बोलत होते. 
 ते म्हणाले, की नरेंद्र मोदींची तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकाचा महाराष्ट्रात सर्वांत आधी निषेध केलेला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण मलीन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा राज्यात पुस्तकावर चर्चा सोडून दुसरीकडेच चर्चा गेली आहे. महाराष्ट्र वेगळे राज्य असून इतर राज्यांना आदर्श देण्याची आवश्यकता आहे.    
...........................
प्रत्येक पक्षात अतिउत्साही लोक आहेत. पवारसाहेबांनी कधीच त्यांना जाणता राजा म्हणा, असे सांगितले नाही. तसेच, मोदी साहेब व बाळासाहेबपण कधी बोलले नाही. पण, अतिउत्साही लोक असतात त्याला कोण समर्थन करतय असही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते व एकच राहणार आहेत. भविष्यातही त्यांना कोणीच आवाहन देऊ शकणार नाही. म्हणून यात पवार, मोदी किंवा बाळासाहेबांची चूक नसून प्रत्येक पक्षात कलाकार लोक असतात त्यांची आहे.  त्यांना प्रत्येक पक्षाने आवर घालायचा असतो. शिवरायांच्या गुरूंबाबत त्यांनी राजमाता जिजाऊ याच त्यांच्या गुरू असल्याची इतिहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंबद्दल जे आवाहन दिले जाते, पुरावे मागितले ही घटना महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. - नितेश राणे, आमदार

Web Title: The true guru of Shivrai is Saint Tukaram Maharaj and Jijau Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.