सोलापूर-पुणे हायवेवरील सावळेश्वर टोलनाका ट्रक चालकांनी फोडला; महामार्गावर वाहतूक ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:41 IST2026-03-24T17:39:29+5:302026-03-24T17:41:06+5:30

सोलापूर: टोल नाक्यावर एका चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेवरून चालकांनी पुकारलेल्या अघोषित रास्ता रोको मुळे गेल्या तासाभरापासून टोलनाक्यावर वाहने पडली अडकून पडली आहेत.

Truck drivers vandalize Sawaleshwar toll plaza on Solapur-Pune highway; traffic on the highway comes to a standstill! | सोलापूर-पुणे हायवेवरील सावळेश्वर टोलनाका ट्रक चालकांनी फोडला; महामार्गावर वाहतूक ठप्प!

सोलापूर-पुणे हायवेवरील सावळेश्वर टोलनाका ट्रक चालकांनी फोडला; महामार्गावर वाहतूक ठप्प!

सोलापूर: टोल नाक्यावर एका चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेवरून चालकांनी पुकारलेल्या अघोषित रास्ता रोको मुळे गेल्या तासाभरापासून टोलनाक्यावर वाहने पडली अडकून पडली आहेत. दरम्यान, तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा  लागल्या आहेत. संतप्त झालेल्या ट्रकचालकांनी सावळेश्वर (ता. मोहोळ) टोलनाक्याची तोडफोड केली. 

दरम्यान, ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पेालिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अचानक झालेल्या गोंधळामुळे टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली होती. गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जखमी ट्रकचालकास उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. सध्या टोलनाक्यावरून वाहनांची ये-जा ट्रकचालकांनी थांबविली असून अचानक आंदोलन सुरू केले आहे. सध्या ट्रक चालक व पोलिसांमध्ये संवाद सुरू असून लवकरच मार्ग काढण्यात येईल असेही राष्ट्रीय महामार्गाच्या पोलिसांनी सांगितले.

Web Title : सोलापुर-पुणे हाईवे पर ट्रक चालकों ने टोल प्लाजा तोड़ा; यातायात ठप।

Web Summary : एक ड्राइवर पर हमले के बाद, ट्रक चालकों ने सोलापुर के पास सावलेश्वर टोल प्लाजा में तोड़फोड़ की, जिससे भारी जाम लग गया। पुलिस मौके पर है, बातचीत कर स्थिति सामान्य करने की कोशिश कर रही है। घायल ड्राइवर को अस्पताल में भर्ती कराया गया है।

Web Title : Truck drivers vandalize Solapur-Pune highway toll plaza; traffic halted.

Web Summary : Following an assault on a driver, truckers vandalized the Savaleshwar toll plaza near Solapur, causing a major traffic jam. Police are on scene, attempting to negotiate and restore order. The injured driver was hospitalized.