मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकला अपघात; १ ठार तर ३ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:00 IST2021-08-06T09:59:14+5:302021-08-06T10:00:16+5:30

१ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

Truck accident at New Kasara Ghat on Mumbai-Agra highway; 1 killed and 3 seriously injured | मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकला अपघात; १ ठार तर ३ गंभीर जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकला अपघात; १ ठार तर ३ गंभीर जखमी

नाशिक -  मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने सदर ट्रक पहाटे ४  वाजता १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने भरपावसात  घटनास्थळी धाव घेऊन पहाटे ४ ते ७ पर्यंतच्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या ३ जणांना सुखरूप बाहेर काढले तर १ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सदर मृतदेह कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीम चे शाम धुमाळ, मनोज मोरे,दत्ता वाताडे अक्षय राठोड विनोद आयरे,लक्ष्मण वाघ,देवा वाघ,जस्सी ,बाळू मांगे यांनी ३ तास अथक प्रयत्न करून ३ गंभीर जखमींना वाचविण्यात यश आले. मदतीला कसारा पोलीस, महामार्ग पोलीस, रस्ते वाहतूक विभागाचे लोक होते.

Web Title: Truck accident at New Kasara Ghat on Mumbai-Agra highway; 1 killed and 3 seriously injured

टॅग्स :Accidentअपघात