शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती

By admin | Updated: March 8, 2015 02:18 IST

अद्यापही अबला महिलांची अहवेलना सुरू असल्याचे विदारक उदाहरण विरार ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले आहे.

विक्रमगड : महिला दिनानिमित्त एकीकडे त्यांचे हक्क व अधिकारांबाबतची चर्चा जगभरात सुरू असताना अद्यापही अबला महिलांची अहवेलना सुरू असल्याचे विदारक उदाहरण विरार ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी महिला प्रस्ूुतीसाठी रुग्णालयात आली असताना तिच्याकडे रिपोर्ट फाइल नसल्याचे कारण सांगत दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिची प्रसूती रुग्णालयाच्या आवारातच खाजगी वाहनात झाली. विशेष म्हणजे एका महिला डॉक्टरने तिचा प्रवेश नाकारला असून, तिच्याविरुद्ध महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील वरिष्ठाकडे तक्रार केली आहे.डोल्हारी (बु.) येथील धाणीव, ता. विरार येथील वीटभट्टीवर काम करणारी दर्शना परशुराम उंबरसाडा ही महिला पोटात दुखू लागल्याने पतीसह शनिवारी सकाळी सात वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात आली. मात्र ड्युटीवरील डॉ. तेजस्वी घोसाळ यांनी महिलेची रिपोर्ट फाइल दाखवा, असे नातलगांना सांगितले. आता आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत असे त्यांनी सांगितले असता, जोपर्यंत रिपोर्ट दाखवत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णाला दाखल करून घेणार नसल्याचे सांगितले. त्या तपासण्यास पुढे आल्या नाहीत. विनंती करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. अशाच अवस्थेत अर्धा तास गेला़ अखेर महिलेला वेदना असह्य होऊन रुग्णालयाच्या आवारातच खाजगी वाहनात प्रसूती झाली. सुदैवाने नवजात बाळ व दर्शनाही सुखरूप राहिल्या. च् दर्शना सकाळी ७ वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्याकरिता आली.च्मात्र ड्युटीवरील डॉ. घोसाळे यांनी रिपोर्टची फाइल नसल्याने तिला तपासण्याची तसदीही न घेता अ‍ॅडमिट करून घेतले नाही.