मुंबई : आदिवासी विभागाच्या सामाजिक सुरक्षेसाठी असलेल्या ४,३४९ कोटींपैकी तब्बल ३,४१६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवण्यात आले आहेत, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. कंत्राटदारांची देणी दिलेली नाहीत. ६२ हजार कोटींची बिले थकीत असल्याने कंत्राटदारांनी ६ एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी विकास विभागाची स्थिती दयनीय आदिवासी मुलांच्या गणवेशासाठी एक वर्ष निधी मिळत नाही आणि आता मार्च अखेरीस केवळ ऑर्डर दिली जाते. नितेश कारळे चालवत असलेल्या फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमीवर कारवाई केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आदिवासी मंत्र्यांच्या मुली विरोधात प्रचार केला, म्हणून या संस्थेची चौकशी करून ती बंद केली. छत्रपती संभाजीनगर इथे २५० कोटींचा क्यूआर कोड घोटाळा झाला आहे. कंत्राटदारांनी कामे न करता कोट्यवधी रुपये लाटले, असे वडेट्टीवार म्हणाले.
Web Summary : Congress alleges ₹3,416 crore meant for tribal welfare was diverted to the 'Ladki Bahin' scheme. Road conditions are poor, contractors unpaid, and tribal development is neglected, claims Vijay Wadettiwar.
Web Summary : कांग्रेस का आरोप है कि आदिवासी कल्याण के लिए ₹3,416 करोड़ 'लाडली बहन' योजना में परिवर्तित किए गए। विजय वडेट्टीवार का दावा है कि सड़कों की हालत खराब है, ठेकेदारों का भुगतान नहीं किया गया और आदिवासी विकास की उपेक्षा की गई।