आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 06:13 IST2026-01-26T06:12:41+5:302026-01-26T06:13:43+5:30

Bhiklya Dhinda News: प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना वयाच्या ९२ व्या वर्षी पद्म पुरस्कार घोषित झाला. ‘आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे. आमच्या अनेक पिढ्या हे वाद्य वाजवत आहेत. आमच्या संस्कृतीमुळे लोक आम्हाला ओळखू लागले असून हीच आमची श्रीमंती आहे, अशा शब्दांत भिकल्या धिंडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

Tribal culture is our wealth! The sentiments of Bhiklya Dhinda, who was honored with the Padma Shri award | आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

मोखाडा/जव्हार - प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना वयाच्या ९२ व्या वर्षी पद्म पुरस्कार घोषित झाला. ‘आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे. आमच्या अनेक पिढ्या हे वाद्य वाजवत आहेत. आमच्या संस्कृतीमुळे लोक आम्हाला ओळखू लागले असून हीच आमची श्रीमंती आहे, अशा शब्दांत भिकल्या धिंडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

कधी ना कधी हा पुरस्कार मला मिळणारच होता, वयाच्या ९२ व्या वर्षी का असेना तो जाहीर झाल्याचे समाधान आहे, हे सांगताना धिंडा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. जव्हारच्या वाळवंडा या गावचे रहिवासी असलेले भिकल्या धिंडा उदरनिर्वाहासाठी तारपा घेऊन तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातात. ‘आम्ही संस्कृती जपली आहे. आमची परिस्थिती हलाखीचीच आहे. माझ्या कुटुंबात २२ माणसं आहेत. थोडी शेती इतकंच माझं साम्राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनेही मला पुरस्कार दिला. त्या पैशातून मी झोपडी बांधली’, असे सांगताना त्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

तारपा वाद्य कसे आहे? तारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सूरवाद्य. ते कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडते. ८ ते १० फूट लांबीचे हे वाद्य. त्याचे तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे भोपळा. यात वाजविणारा मोठ्या ताकदीने सारखा फुंक मारत राहतो. या भोपळ्यातली हवा मग वाद्याच्या दुसऱ्या भागात दोन पोकळ बांबूच्या नळ्यांत जाते. एका नळीला सहा स्वरछिद्रे असतात. यावर निरनिराळे स्वर उत्पन्न करता येतात. एकच स्वर तुटकपणे वाजविता येत नाही.

Web Title : आदिवासी संस्कृति ही हमारी संपत्ति: पद्म श्री से सम्मानित भिकल्या धिंडा

Web Summary : पद्म श्री से सम्मानित तारपा वादक भिकल्या धिंडा आदिवासी संस्कृति को संजोते हैं। 92 वर्ष की आयु में, उन्होंने खुशी व्यक्त की और अपनी विनम्र शुरुआत को याद किया। बड़े परिवार का समर्थन करने के लिए वित्तीय संघर्षों के बावजूद, वह अपनी सांस्कृतिक विरासत और महाराष्ट्र से पिछली मान्यता को महत्व देते हैं।

Web Title : Tribal culture is our wealth: Bhiklya Dhinda honored with Padma Shri

Web Summary : Padma Shri recipient Bhiklya Dhinda, a Tarpa player, cherishes tribal culture. At 92, he expresses joy and recalls his humble beginnings. Despite financial struggles supporting his large family, he values his cultural heritage and past recognition from Maharashtra.