शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

माहिती देण्यावरुन परिवहन विभागाची ‘चुप्पी’

By admin | Updated: December 18, 2014 05:34 IST

नवी दिल्लीत उबर या खाजगी टॅक्सी कंपनीच्या चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील खाजगी टॅक्सीं

मुंबई : नवी दिल्लीत उबर या खाजगी टॅक्सी कंपनीच्या चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील खाजगी टॅक्सींची तसेच चालकांची माहिती घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. एक आठवड्यापूर्वी फक्त पत्रकार परिषदेतून खाजगी टॅक्सींबाबत घेतलेल्या निर्णयाची माहीती दिल्यानंतर परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक ‘चुप्पी’ साधली. नवी दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर राज्य परिवहन विभागाने मुंबईतील खाजगी टॅक्सीसंदर्भात काही निर्णय घेतले. ११ डिसेंबर रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत खाजगी टॅक्सींना चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील योजना सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. यात १२ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत खाजगी टॅक्सी कंपन्यांना चालक आणि वाहकांची माहीती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तर ३१ डिसेंबरपर्यंत प्रवासी सुरक्षेसंदर्भातील योजना आणि १५ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. या माहितीनंतर अ‍ॅप बेस खाजगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालण्याचा विचार असल्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचे समोर आले. विधानसभा अधिवेशनात याची घोषणा करण्यापूर्वीच परिवहन सचिवांकडून बंदीचे जाहिर करण्यात आल्याने परिवहन आयुक्तांकडून यापुढे कुठलेही विधान न करण्याच्या सूचना परिवहन विभागाला दिल्या. त्यानंतर विभागाकडून कुठलीच माहीती समोर येऊ देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)