राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 23:08 IST2025-05-16T23:05:35+5:302025-05-16T23:08:55+5:30
Maharashtra Police: राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्ह्यांतील प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले.

राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्ह्यांतील प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले आहेत. यामध्ये पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त आणि पोलिस उप महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह बदलाचे वारे वाहू लागले आहेत.
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- शैलेश बलकवडे, जे सध्या पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, त्यांची बदली मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी करण्यात आली.
- अनिल पारसकर यांची बदली अपर पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई येथे झाली.
- एम. रामकुमार यांना संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली.
- शशीकुमार मीना यांची नियुक्ती अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे झाली.
- प्रविण पाटील यांची बदली अपर पोलिस आयुक्त, नागपूर या पदावर झाली.
- संजय बी. पाटील यांची बदली अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर म्हणून झाली.
- वसंत परदेशी यांना देखील नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.
- एस.डी. आव्हाड यांची बदली अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आली.
- एस.टी. राठोड यांची बदली पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे करण्यात आली.
- पी.पी. शेवाळे यांची नियुक्ती पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे झाली.
- विनिता साहु यांची बदली अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल या पदावर झाली.