शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी लक्ष्य

By admin | Updated: December 17, 2014 00:36 IST

चोर लुटारूंनी शहरातील व्यापाऱ्यांना सोमवारी रात्री टार्गेट केले. ७ ते ९ अशा अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चोरट्यांनी एका व्यापाऱ्याची कारमधून बॅग लंपास केली. दुसऱ्याच्या

नागपूर : चोर लुटारूंनी शहरातील व्यापाऱ्यांना सोमवारी रात्री टार्गेट केले. ७ ते ९ अशा अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चोरट्यांनी एका व्यापाऱ्याची कारमधून बॅग लंपास केली. दुसऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतील रक्कम चोरून नेली. तर, तिसऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. गणेशपेठ, कोतवाली आणि प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. गणेशपेठकारमधील रोकड लंपासनंबर प्लेटवर रक्त पडल्याचे सांगून संजय कांतीलाल गौतम (वय ४४) यांच्या कारमधील बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगमध्ये ६० हजारांची रोकड होती. गौतम हे आदित्य एकविरा अपार्टमेंटमध्ये राहातात. त्यांचे इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. सोमवारी रात्री ७.१५ च्या सुमारास गौतम आपल्या आल्टो कारने घराकडे निघाले. अग्रसेन चौकात एका मुलाने गौतम यांना ‘तुमच्या गाडीच्या नंबरप्लेटवर रक्त पडले आहे‘, असे सांगितले. त्यांनी तेथे न थांबता गणेशपेठेतील मारवाडी चाळीजवळ कार थांबवली. कारमधून उतरल्यानंतर मुलांना बोलविण्यासाठी ते गोदामाकडे गेले. तेवढ्या वेळेत चोरट्यांनी त्यांच्या कारमधील ६० हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. गौतम यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोतवालीअ‍ॅक्टिव्हातून रक्कम लंपासबालकिसन रूपचंद बियाणी (वय ४४, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, तुळशीबाग) यांचे भगवती बूक डेपो आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास दुकानातील ७० हजारांची रोकड घेऊन ते निघाले. दुकानाला कुलूप लावले नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी अ‍ॅक्टिव्हा दुकानासमोर उभी केली आणि कुलूप लावायला गेले. तेवढ्या वेळेत चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील ७० हजारांची रोकड चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर बियाणी यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रतापनगरअ‍ॅक्टिव्हा अन् रक्कम हिसकावलीअनुप जयप्रकाश पनपानिया (वय ४२) सोमवारी रात्री ९ च्या सुमारास दुकान बंद करून सुभाषनगरातील आपल्या घराकडे जात होते. वडनेरे ज्वेलर्ससमोर दुचाकीवर आलेल्या तीन लुटारूंनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करीत दुचाकीच्या खाली उतरविले. पनपानिया यांची दुचाकी हिसकावून आरोपी पळून गेले. या दुचाकीच्या डिक्कीत ८५ हजार रुपये होते. पनपानिया यांचा दुकानापासूनच आरोपी पाठलाग करीत असावे, असा संशय आहे. पनपानिया यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)