शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबात पर्यटकांची अडचण होणार नाही - एमटीडीसी

By admin | Updated: February 28, 2015 04:51 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी ज्या परदेशी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे़, त्यांची कोणतीही अडचण होणार नाही,

मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी ज्या परदेशी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे़, त्यांची कोणतीही अडचण होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ताडोबात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सुविधा एमटीडीसीने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ५ मार्चसाठी ९३ आणि ६ मार्चसाठी ६३ अशा एकूण १५६ वाहनांचे आरक्षण झाले आहे. मात्र, वनविभागाने काढलेल्या व्याघ्र प्रकल्प बंदच्या आदेशामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर लोकमतने सोनी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्यासाठी आपले पर्यटक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच परदेशी पर्यटकदेखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांनी बुकिंग करून आपला भारतात येण्याचा कार्यक्रम ठरवला असेल अशांना शासकीय सुटीची कोणतीही अडचण होणार नाही. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ आणि तशा सूचनादेखील देऊ, असे स्पष्टीकरण सोनी यांनी दिले़ (प्रतिनिधी)