शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होतील; विजय वडेट्टीवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 1:03 PM

emergency relief: पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

ठळक मुद्देप्रशासनाला तातडीने पंचनामे करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना .

नागपूर: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. यातच आता सरकारने या नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्यापासून 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच त्यांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. याशिवाय, पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल, असंही ते म्हणाले.

लोकांमध्ये गैरसमज झालायावेळी विजय वड्डेटीवार यांनी केंद्राकडून मिळालेल्या मदतीवरही भाष्य केलं. केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षी आलेल्या ऑक्टोबरच्या पुराचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बघा पूर आला आणि पैसे दिले, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. आम्ही 3721 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले 700 कोटी मिळाले. तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत मिळाली नाही. या सर्व संकटात 420 आणि 721 कोटी राज्याला मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत 1141 कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :floodपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRainपाऊस