शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 12:34 IST

संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा

ठळक मुद्देराऊत यांनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आम्ही आहोत, राऊतांचं वक्तव्य

"मराठी माणसाला अभिमानानं मी मराठी आहे हे बोलायला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच शिकवलं. जो मराठी माणूस खचला होता, दुबळा पडला होता, आपल्या मुंबई, महाराष्ट्रात ज्यानं आत्मविश्वास गमावला होता त्याच्या मनगटात बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याची प्रेरणा दिली त्यामुळेच आजचा महाराष्ट्र उभा आहे. आज मराठी माणूस सर्व क्षेत्रात झेप घेताना दिसत आहे. त्याचं मूळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेमध्ये, लढ्यामध्ये आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अनेक घाव छातीवर झेलेले," असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "आम्हाला बाळासाहेबांनीचं घडवलं. बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आम्ही आहोत असं म्हणत अनेक शतकं मराठी माणूस त्यांचं स्मरण करत राहील," असंही राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या आणि देशातील राजकारणाला एक वेगळं वळण दिलं. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची लाटही निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं. "या महाराष्ट्रात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळी सत्तेत काँग्रेस होते. बाळासाहेबांनी त्यानंतर दिलेला शब्द खरा करून दाखवला. मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच होऊ शकले. आज महाराष्ट्रात जो भाजप आहे त्यांची जी ताकद आहे त्याचंदेखील श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यायला हवं. जर शिवसेनेनं युती केली नसती तर आज राज्यातील गावामध्ये असलेला भाजप दिसला नसता आणि हे सत्य भाजपचे नेतेदेखील स्वीकारतील," असंही राऊत म्हणाले. "राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढली गेली. बाबरीच्या पतनानंतर त्यांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली. जर भाजप त्यांची आठवण काढत असेल तर चांगलंच आहे," असंही ते म्हणाले. भाजपनं कोणते प्रश्न निर्माण करू नये. त्यांची प्रश्नपत्रिका महाराष्ट्राच्या अद्याप चाचणी परीक्षेलाही आलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे Maharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा