शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

तंबाखू खाल तर बडतर्फ व्हाल, भरतीवेळेस परिवहनमंत्र्यांचा इशारा

By admin | Updated: November 2, 2015 02:57 IST

तंबाखू खाणार तर बडतर्फीची कारवाई एसटीच्या कनिष्ठ चालकांवर केली जाईल, असा थेट इशारा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे.

मुंबई : तंबाखू खाणार तर बडतर्फीची कारवाई एसटीच्या कनिष्ठ चालकांवर केली जाईल, असा थेट इशारा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे. तंबाखू किंवा पान खाऊन थुंकल्यामुळे एसटीच्या बस अस्वच्छ होत आहेत. यामध्ये एसटीच्या चालकांकडूनच अस्वच्छता पसरवली जात असल्याने, भरतीतील नवीन कनिष्ठ चालकांना हा इशारा देण्यात आला. या चालकांकडून एक प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. एसटीच्या बहुतांश चालकांकडून तंबाखू किंवा पान खाण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्याबरोबरच एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. बस चालवताना तंबाखू किंवा पान खाऊन थुंकल्यामुळे, बस गाड्या अस्वच्छ होत असल्याने नवीन चालकांकडून तंबाखू न खाण्याबाबत प्रत्यक्षात लिहून घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वीच परिवहनमंत्र्यांसोबत एसटीच्या कामगार संघटनांची एसटीच्या मुंबईतील मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत तंबाखू खाणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि बस गाड्यांच्या स्वच्छतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भरतीच्या वेळेसच महामंडळाचा संदेशएसटी महामंडळात ३६ हजार चालक असून, सध्याच्या चालकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. हे पाहता एसटी महामंडळाकडून नवीन कनिष्ठ चालकांची भरती केली जात आहे. अशा ७ हजार ६३0 कनिष्ठ चालकांची भरतीप्रक्रिया पूर्ण होत असून, सध्या एसटीच्या पुण्यातील भोसरी येथील ट्रॅकवर वाहन चाचणी होत आहे. यात राज्यातील एसटीच्या दोन-तीन विभागांत काही चालक दाखलही झाले आहेत. मात्र, या चालकांकडून एसटी महामंडळाने तंबाखू न खाण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही प्रक्रिया पारही पाडली जात आहे. कुंभमेळ््यादरम्यान वाहकांकडून पैसे हडप परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासोबत एसटीच्या युनियनची बैठक पार पडली. यात कुंभमेळ््यादरम्यान चालकांकडून तिकिटांच्या रक्कम हडप करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. असे जवळपास सहा वाहक आहेत, वाहकांकडून असे होता कामा नये. या वाहकांवर कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे एसटीच्या बस गाड्या या अस्वच्छ होत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच चालकांच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. - दिवाकर रावते (परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)