शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लॉकडाऊनला कंटाळलात, शेतावर जा... मौजमज्जा करा

By यदू जोशी | Updated: September 18, 2020 01:35 IST

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून कृषी पर्यटनाला पहिल्यांदाच राजाश्रय मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच यासंबंधीच्या धोरणास मान्यता दिली.

- यदु जोशीमुंबई : कोरोनानंतरच्या इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊनला कंटाळलात, आता निसर्ग तुम्हाला खुणावतोय? मग आता शासनाच्या नव्या धोरणानुसार शेतावर जा, विटी-दांडू, हुतूतू, लंगडी खेळा, मस्त झोके घ्या, खिल्लारी बैलांची जोडी असलेल्या बैलगाडीत फिरा. खास मºहाटी किंवा इतर मनपसंत पदार्थांवर ताव मारा आणि जमलं तर मुक्कामही करा. राज्यात लवकरच ठिकठिकाणी कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून तेथे तुम्हाला हा आनंद लुटता येईल.पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून कृषी पर्यटनाला पहिल्यांदाच राजाश्रय मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच यासंबंधीच्या धोरणास मान्यता दिली. कृषी पर्यटन केंद्रांमध्ये पोवाडा, गोंधळ, जागरण, लेझीम, भजन-कीर्तन, आदिवासी नृत्याची मेजवानी असेलच शिवाय बलुतेदार, अलुतेदार, वासुदेव, डोंबारी, बहुरूपी ही ग्रामीण जीवनाची वैशिष्ट्येही तुम्हाला अनुभवता येतील. लहान मुलांसाठी खेळ, साहसी खेळ, ग्रामीण खेळांची सोय असेल. शेतमालाच्या उत्पादनाच्या जोडीने हे केंद्र चालवावे लागेल आणि पर्यटकांना तेथील कृषी उत्पादने विकत घेण्याचीही व्यवस्थाअसेल. पर्यटन केंद्र हे त्यांच्यासाठी जोड व्यवसाय ठरेल.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची किमान एक सहलया ठिकाणी आयोजित करणे शाळांना अनिवार्य असेल. वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, खासगी किंवा शासकीय कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनीस या केंद्राची उभारणी करता येईल. काही खासगी व्यक्ती, संस्थांची केंद्रे राज्यात सुरू आहेत, पण या संकल्पनेला पहिल्यांदाच राजाश्रय लाभणार आहे. वर्षाअखेर ही केंद्रे सुरू होतील.तुम्ही उभारू शकता केंद्रशेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात असे पर्यटन केंद्र उभारता येईल. त्यासाठीचे नोंदणी शुल्क २,५०० रुपये असेल. दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागेल आणि त्याचे शुल्क केवळ एक हजार रुपये राहील. नोंदणी पर्यटन विभागाकडे करावी लागेल. कमीत कमी एक एकर जागेवर ते उभारता येईल. सहलींचे आयोजन करायचे तर किमान पाच एकर शेती असणे ही अट राहील. कृषी पर्यटन केंद्र चालकांना आदरातिथ्यापासून आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रagricultureशेती