शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:15 IST

Tipu Sultan Congress Harshavarhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून वाद, भाजप-शिंदेसेनेकडून जोरदार टीका

Tipu Sultan Congress Harshavarhan Sapkal: मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान फोटो लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. शिंदेसेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केल्यानंतर, अखेर शनिवारी हा फोटो दालनातून काढण्यात आला. पण याचदरम्यान, टिपू सुलतानबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केले असून त्यावरून मोठा वाद सुरु झाला आहे. त्यांनी टिपू सुलताची बरोबरी थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याशी केल्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत व्यक्त केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर भाजप-शिंदेसेनेचे टीकास्त्र

फोटोचा वाद शांत होत असतानाच, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आला आहे. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळांवर टीका करत, काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, असे विधान करणं हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे असेही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महाराष्ट्रातील जनतेने चपलेने हाणायला पाहिजे, असा संताप शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

मालेगावमध्ये काय घडलं होतं?

मालेगावातील टिपू सुलतान फोटो प्रकरणात उपमहापौर अहमद यांच्या दालनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात त्यांच्यापाठीमागे टीपू सुलतान फोटो लावल्याचे दिसून आले. त्यानंतर, शिंदेसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतान फोटो हटवण्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह आयुक्त कार्यालय गाठले. "जोपर्यंत हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत आमचा निषेध सुरूच राहील आणि तो अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा नीलेश आहेर यांनी दिला. त्यानंतर हा फोटो हटवला गेला.

English
हिंदी सारांश
Web Title : Tipu Sultan likened to Shivaji Maharaj: Congress leader sparks controversy.

Web Summary : Congress leader Harshvardhan Sapkal's comparison of Tipu Sultan to Shivaji Maharaj ignited controversy. BJP and Shinde Sena strongly criticized Sapkal's statement, demanding an apology, after a Tipu Sultan photo sparked protests in Malegaon.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना