अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 08:18 IST2024-03-12T08:17:05+5:302024-03-12T08:18:10+5:30

एका कार्यक्रमात शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत. 

time to take revenge on ajit pawar vijay shivtare appeal from baramati | अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

लोकमत न्यूज नेटवर्क, सासवड (पुणे) : सासवडमधील पालखी तळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. त्या अपमानासाठी  अजित पवार इथे येऊन  माफी मागणार का, असा प्रश्न उपस्थित करीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. आता अजित पवारांचा बदला घेण्याची  वेळ आली असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी  सांगितले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडच्या पालखी तळावरून भाषणात विजय शिवतारे यांना आव्हान दिले होते. त्यावेळी शिवतारेंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच पालखी तळावर रविवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत. 


 

Web Title: time to take revenge on ajit pawar vijay shivtare appeal from baramati