शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

टायगरचा आज फैसला दोषी की निर्दोष?

By admin | Updated: May 6, 2015 04:22 IST

बहुचर्चित हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खान दोषी की निर्दोष आहे, याचा फैसला सत्र न्यायालय उद्या बुधवारी जाहीर करणार आहे.

मुंबई : बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेला सलमान खानचा हिट अँड रन अखेर अंतिम टप्प्यात आला आहे. सलमान या प्रकरणात नक्की दोषी आहे की नाही, हे आज बुधवारी ठरणार आहे.

सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा ठोठवावी, यावर सरकारी पक्ष युक्तिवाद करेल. त्यानंतर बचाव पक्षही आपली बाजू मांडेल. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालय सलमानला शिक्षा सुनावेल. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही घटना २८ सप्टेंबर २००२ रोजी घडली. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. २८ साक्षीदार तपासले> सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यासमोर हा खटला चालला. सलमानचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने २७ साक्षीदार तपासले, तर सलमान निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी एकच साक्षीदार तपासला. च्त्यानंतर या घटनेबाबत उभय पक्षांचा युक्तिवाद झाला. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला.खटल्यातील महत्त्वाच्या तारखा२८ सप्टेंबर २००२ रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी सलमानला अटक झाली व त्याची जामिनावर सुटकाही झाली.७ आॅक्टोबर २००२ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पुन्हा सलमानला अटक झाली व त्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला.2003 बचाव पक्षाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. सरकारी पक्षाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय सुनावणी न्यायालयावर सोडला.2006 मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू.2011सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यासाठी सरकारी पक्षाने विशेष न्यायालयात अर्ज केला.३१ जानेवारी २०१३ - वांद्रे न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी दिली.२८ एप्रिल २०१४ : सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला.सलमानवरील आरोपसदोष मनुष्यवध - दहा वर्षे शिक्षाभरधाव गाडी चालवणे - दोन वर्षेनिष्काळजीपणा - दोन वर्षेगंभीर दुखापत करणे - सहा महिनेकिरकोळ दुखापत करणे - दोन महिने