शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जंगलांमध्ये वाघांच्या बारशाची धूम

By admin | Updated: July 29, 2016 05:17 IST

वाघांच्या आकड्यांचा खेळ नेहमीच खेळला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून विदर्भातील जंगलांमध्ये वाघांच्या नामकरणाची धूम सुरु आहे. अगदी जंगलाशेजारी राहणाऱ्या

- सविता देव हरकरे२९ जुलै जागतिक व्याघ्र दिनानिमित्त मार्केटिंगचा फंडा वाघांच्या जीवावर; सेलिब्रेटीकरण कशासाठी?नागपूर: वाघांच्या आकड्यांचा खेळ नेहमीच खेळला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून विदर्भातील जंगलांमध्ये वाघांच्या नामकरणाची धूम सुरु आहे. अगदी जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांपासून तर वन्य कर्मचारी आणि अधिकारीही यात मागे नाहीत. परंतु मार्केटिंगचा हा फंडा जंगलच्या या राजाच्या जीवावर तर बेतणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे.सध्या बेपत्ता असलेला आणि वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविणारा उमरेड-कऱ्हांडलातला 'जय' असो वा एकेकाळी आपल्या एका दर्शनासाठी चाहत्यांना तासन्तास ताटकळत ठेवणारी ताडोबातील 'बांडी' उर्फ कटरी; वाघांचे हे नामकरण म्हणजे कुतुहलाचा आणि तेवढाच चिंतेचा विषय ठरले आहे. घरात मुल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका असाच प्रकार वाघांच्या बाबतीतही घडत आहे. जंगलात वाघाचा नवा बछडा दिसला की त्याचे नाव काय ठेवायचे यासाठी स्पर्धा सुरु होते. नावाचा हा महिमाच म्हणावा लागेल की आज विदर्भातील जंगलांमधील वाघ त्यांच्या युनिक कोडपेक्षाही जास्त या मानवी नावांनी ओळखले जातात.अशी सुरु झाली प्रथा...इ.स.२००८-०९ मध्ये ताडोबा-अंधारीत एक शेपटी तुटलेली वाघीण होती. त्यामुळे तेथील वनकर्मचारी आणि गाईड तिला 'बांडी ' किंवा 'कटरी' असे संबोधित असत. त्यावेळी हे नाव जगभरातील वन्यजीवप्रेमींमध्ये एवढे प्रसिद्ध होईल याची कल्पनाही त्यांना नसावी. या 'बांडी' ला बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांची येथे गर्दी होऊ लागली. आणि बघताबघता ही बांडी बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. वाघाच्या नावाचे अशा पद्धतीनेही मार्केटिंग होऊ शकते हे लक्षात येताच इतर अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांमध्येही वाघांच्या नामकरणाचा सपाटा सुरु झाला. मग 'माई' चे आगमन झाले. नागझिराच्या जंगलात आपला दबदबा निर्माण करणारी ही माई यावर्षी चोरखामाराजवळ मृतावस्थेत आढळली. उमरेड-कऱ्हांडलातला 'जय ' म्हणजे या माईचाच बछडा. त्याचा भाऊ म्हणजे 'विरू'. तो सुद्धा २०१२-१३ पासून बेपत्ता आहे. नागझिऱ्यातच डेंडू आणि राष्ट्रपती नावाचेही वाघ होऊन गेलेत. उमरेड-कऱ्हांडलात जयसोबत श्रीनिवास, बिट्टू, चांदी, राई, फेअरी या नावाने वाघ ओळखले जातात. तर बोर अभयारण्यात कॅटरिना आणि बाजीरावची धूम आहे. पेंचमध्ये एका ढाण्या वाघाचे नाव वीरप्पन ठेवण्यात आले आहे. तोतलाडोहपासून कोळसापारपर्यत फिरतो तो 'प्रिन्स' तर फेपरीकुंडकडे दर्शन देते ती 'शीला'. सोनू,मोनू, लंगडी अशी नानाविध नावे या वाघांना ठेवण्यात आली आहेत. पेंचमध्ये टी-५ वाघिणीचे दोन बछडे बाजीराव-मस्तानी या नावाने परिचित आहेत.सेलिब्रेटीकरणाने असुरक्षितता वाढली...जंगलातील वाघांना सेलिब्रेटी करुन त्यांच्या नावाच्या मार्केटिंगद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा हा फंडा वाघांची असुरक्षितता वाढविणारा असल्याची चिंता काही वन्यजीव कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. विदर्भातील वाघ लोकप्रिय झाले त्यात त्यांच्या नावांचे योगदान महत्वाचे असले तरी त्याचा अतिरेक होता कामा नये,अशी त्यांची भूमिका आहे. जयच्या बेपत्ता होण्यामागेही त्याची प्रचंड लोकप्रियताच कारणीभूत असल्याचे त्यांना वाटते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी रणथंबोर अभयारण्यात भोभुराम नावाचा वाघ बघितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो बेपत्ता झाला होता,हे उल्लेखनीय! विशेष म्हणजे वाघांच्या या मार्केटिंगला वनविभाग आणि काही स्वयंसेवी संघटनांचेही समर्थन प्राप्त आहे.सवंग लोकप्रियता...वाघांच्या नावांचा बोलबाला सुरु असताना काही वनअधिकारी सवंग लोकप्रियतेसाठी वाघांना आपली नावे देत असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.काय आहे युनिक कोडमिळालेल्या माहितीनुसार आतापर्यत देशभरात १४०० वाघ कॅमेरात ट्रॅप झाले असून त्यांना टी-१,टी-२ अशाप्रकारची सांकेतिक नावे देण्यात आली आहेत. या युनिक कोडवरुनच वाघाची ओळट पटत असते. विशेष म्हणजे एखाद्या वाघाला दिलेला युनिक कोड दुसऱ्या कुठल्या वाघाला दिला जात नाही. त्या वाघासोबतच तो संपत असतो. त्यामुळे वाघांच्या नामकरणाचा हा प्रकार सभ्रम वाढविणारा आहे.वाघांचे अशापद्धतीने नामकरण कदापि योग्य नाही. व्यक्तिमहात्म्याचा हा प्रकार आहे. शास्त्रोक्त पद्धतीनुसार युनिक कोडद्वारेच त्यांची ओळख असावी. जय असो वा आणखी कोणी; वाघ तो वाघच!किशोर मिश्रिकोटकर,डीएफओ, नागपूरवाघांच्या जीवनात आम्ही फार जास्त हस्तक्षेप करीत आहोत. नामकरणाची ही पद्धत वाघांच्या जीवावर उलटायला नको. तेव्हा ही पद्धत योग्य की अयोग्य याचा महाराष्ट्र शासनाने सारासार विचार केला पाहिजे.किशोर रिठे,वन्यजीवतज्ञ