शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

नोटाबंदीच्या माध्यमातून जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 5:27 PM

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे.

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढत असून, लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक सक्षम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यात केले.ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ऑलिम्पस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन हे प्रामुख्याने उपस्थित होते. डिजिटायझेशनच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टीसीएसच्या ऑलिम्पस सेंटरचे उद्घाटन आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती योगायोगाने एकाच दिवशी असून, याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत. त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. नोटाबंदीमुळे देशाची प्रगती खुंटल्याचा आरोप करणा-या विरोधकांनी टीसीएसचा कारभार एकदा आवर्जून पाहावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. टीसीएसच्या मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर येथील प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. माहिती तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी राहावे, यासाठी टीसीएसने महत्वाची भूमिका बजावली. आजच्या तरुणांना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याएवढे सक्षम बनण्यात जास्त रस आहे. त्यामुळे नवउद्योजक तयार होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.राज्यातील बुद्धिमान तरुणांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती व्हावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. टीसीएसची ठाण्यातील इमारत अवघ्या दीड वर्षात उभारल्याचे गोपीनाथन यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाला महापौर मिनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबिरसिंग, महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे