शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत झाई समुद्रात रंगले पाठलागाचे थरारनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:30 IST

महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी केंद्रावरून मांगेला समाज मच्छीमार सोसायटीची गीताप्रसाद ही बोट बुधवारच्या पहाटे मासेमारीला गेली होती.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : झाई समुद्रकिना-यापासून सुमारे दोन नॉटिकल परिसरात दोन स्पीडबोटी संशयास्पदरीत्या फिरत होत्या. त्यांनी मासेमारी बोटींकडे मोर्चा वळविल्यानंतर मच्छीमारांनी किनारा गाठून तटरक्षक दल आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर तत्काळ शोधमोहीम राबवून त्यांचा पाठलाग केला असता, त्या नौदलाच्या ‘स्वरा’ आणि ‘सुरभी’ या स्पीडबोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्याकडे ओळखपत्र तसेच कागदपत्र नसल्याचे तपासयंत्रणांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी केंद्रावरून मांगेला समाज मच्छीमार सोसायटीची गीताप्रसाद ही बोट बुधवारच्या पहाटे मासेमारीला गेली होती. बोटीत जयवंत दवणे, रीतेश दवणे, दीपक दवणे, गोविंद दवणे हे होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास किना-यापासून दोन नॉटिकल अंतर परिसरात पांढ-या-राखाडी रंगाच्या दोन स्पीडबोटी त्यांच्या जवळ येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर कोणताही ध्वज नव्हता, त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी तत्काळ किनारा गाठून तटरक्षक दल आणि घोलवड पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांना घेऊन ८.३०च्या सुमारास ‘त्या’ बोटींचा शोध सुरू केला. डहाणू तटरक्षक दलाने दमण तळावरील हेलिकॉप्टरला पाचारण करून शोध घेण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही बोटींवरील व्यक्तींना शरण येण्यास सांगितले. त्या वेळी आपण नेव्हीच्या सर्व्हे विभागातील असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बोटींवरील सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या १२ व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र आणि कागदपत्र नव्हते. आयएनएस जमुना या मुख्य बोटीच्या स्वरा बोटीचे लेफ्टनंट यश भारद्वाज आणि सुरभीचे लेफ्टनंट दीपक भाटी होते. त्यांच्यावर गुजरात राज्यातील खंबायत (हाजीरा) ते उंबरगाव या परिसराच्या हायड्रोग्राफिक सर्व्हेची जबाबदारी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे स. पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. ११.३०च्या सुमारास कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी तटरक्षकच्या टीमसह झाई बंदर गाठले.