नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातात धुळ्याच्या नगरसेवकासह तिघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 16:28 IST2018-09-14T16:27:52+5:302018-09-14T16:28:37+5:30
अपघातात धुळे महापालिकेतील नगरसेकव कुमार देयलानी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले राजीव भाटिया, लखू महाराज हे जागीच ठार झाले.

नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातात धुळ्याच्या नगरसेवकासह तिघे ठार
शहापूर : नाशिक- मुंबई महामार्गावर भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी होऊन पेंढरघोळजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात धुळे महापालिकेतील नगरसेकव कुमार देयलानी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले राजीव भाटिया, लखू महाराज हे जागीच ठार झाले. तर रमेश कुकरेजा व हुसेन अत्राम हे जखमी झाले असून शहापूरच्या सय्यद हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे करीत आहेत.