शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीसाठी केली तीनशे झाडांची कत्तल

By admin | Updated: July 10, 2014 23:18 IST

तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले.

सोनाळा : येथील सोनाळा-बोरखेड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने हजारो रुपये खर्च करुन तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले. याबाबतची तक्रार बोरखेड वासीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.सोनाळा ते बोरखेड रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग जळगाव जामोदने गत ३ वर्षापूर्वी वृक्षांची लागवड केली आहे. तर या झाडांची जोपासणा करुन ही झाडे जगविली आहेत. मात्र १४१ गाव वानपाणी पुरवठा योजने अंतर्गत बोरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे काम सुरु असून १५ दिवसांपूर्वी जे.सी.पी. क्र.एम.एच.४१ डि. ७१७१ च्या चालकाने डाब्या बाजुने असलेल्या वृक्षांच्या दोन रांगामधून जेसीबीने पाईपलाईनसाठी मोठी चर खोदली. यामुळे वृक्षारोपण केलेली सुमारे ३00 चे वर पाच ते आठ फुटाची झाडे बुंध्यासह उखडली.बोरखेडवासीयांनी संबंधीत ठेकेदाराला वृक्षांच्या बाजूला अंतर सोडून पाईपलाईन खोदण्याचे सांगीतले असताना हेकेखोरपणे चक्क १५ दिवस काम बंद ठेवले होते. अखेर ७ जुलै रोजी पुन्हा ठेकेदाराने जेसीपी एम.एच.४१ डी. ७१७१ ने रस्त्यावर खोदाई काम सुरु केले. यामध्ये ३00 च्यावर झाडे बुथ्यासोबत उखडून पडली.सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील वृक्षाचे रक्षणाकरिता एका मजुराची नेमणूक केली होती. त्याच्या समक्ष वृक्षांची कत्तल होत असतानाही सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्यापही दखल घेतल्या गेली नाही. गेल्या तीन वर्षापासून दररोज १0 मजुर १६८ रु. रोजंदारीने या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहेत.मात्र पाईपलाईनसाठी वृक्षांची कत्तल झाल्याने शासनाच्या हजारो रुपयावर पाणी फेरले गेले असून वृक्षारोपणाचा उद्देशही साध्य झाला नाही. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकार्‍यांकडे चौकशीसाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे वृक्ष कत्तलीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने तर छुपी परवानगी दिली नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा वृक्षांची कत्तल करणार्‍या संबंधित ठेकेदार व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी याबाबत दिलेल्या निवेदनावर संतोष आगलावे, यशवंत घाटे, मोहन बारब्दे, सिध्दार्थ घाटे, दीपक बाराब्दे, श्रीकृष्ण आगलावे, किसन बारब्दे आदींसह दोनशे गावकर्‍यांच्या सह्या आहेत.