वसई : वांद्रे स्थानक उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना वालीव-वसई येथून अटक करण्यात आली. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता, एका आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दुसरा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षाला दोन दिवसांपूर्वी एक कॉल आला. ‘दोन दिवसांत वांद्रे स्थानक उडवण्यात येईल,’ असे सांगितले होते. मुंबईच्या एटीएसला याची माहिती दिली. वालीव पोलिसांनी कॉलची माहिती घेऊन उत्तम चौधरी (२४) व सौरव सरोजी (१५) या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}