शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

हेच पवारांच्या पोटात दुखतंय, संतप्त चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:50 IST

पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला.

मुंबई - मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली. अचानक घडलेल्या या घटनेनं आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीच्या घटनेवरुन थेट पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर गेल्याचं सरंजामशहांना पहावत नाही, असे पाटील यांनी म्हटलं. 

पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला. यावर, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सर्व पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, टिकाकारांना प्रत्युत्तर देताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी वाचलंय, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यासाठीचा संघर्ष मी केलाय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांवर माझ्यासोबत डिबेट करायला या, असे चॅलेंज आमदार रोहित पवार आणि नाना पटोलेंना दिले. 

माझ्यासारखा गिरणीकामगाराचा मुलगा एवढा मोठा झालाय, हेच पवारांच्या पोटात दुखतंय. सरंजामशाहीवाल्यांना हेच पाहवत नाही, रोहित पवारांसारखा राजकीय घरातून मोठा झालो नाही, मी चळवळीतून मोठा झालेलोय, असे म्हणत बाबासाहेब आधी वाचून माझ्याकडे या, असे चॅलेंजच रोहित पवारांना चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

शाईफेकीचं बारामीत कनेक्शन?

भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर चौदा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे .त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यासह 14 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले रोहित पवार

“चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या  विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे,” असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

कोणी फेकली शाई?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोले