शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 08:23 IST

शासन निर्णयावर आता प्रश्न उपस्थित करणारे विनोद पाटील हे आंदोलनाच्या वेळी चर्चा सुरू असताना ‘ताज’मध्ये झोपले होते का? असा टोला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्यासंदर्भात काढलेला शासन निर्णय हा कुणबी प्रमाणपत्र काढण्याविषयीची माहिती पुस्तिका असल्याची टीका मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

पाटील म्हणाले, यापूर्वीही कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची अट होती. ज्याच्याकडे महसुली पुरावा नाही, त्यांच्यासाठी शासनाचे अधिकारी गृह अहवाल तयार करतात. त्यानुसार तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे शासनाने उपोषण सोडविण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयात नवीन काहीच नाही. केवळ माहिती पुस्तिका दिली आहे. शासनाकडून स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची 

उपसमिती उत्तम काम करीत असल्याचे सांगितले, तसेच ज्यांचे पुरावे आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल. ओबीसींमध्येही कोणालाही सरसकट प्रवेश दिलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले. त्यामुळे काढलेल्या शासन निर्णयाचे  फलित काय, असा प्रश्नही निर्माणझाला. उपोषण सोडविताना त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अभ्यासकांनी शासन निर्णयावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले नाही, असा सवालही पाटील यांनी केला. 

चर्चेवेळी झोपले होते का? शासन निर्णयावर आता प्रश्न उपस्थित करणारे विनोद पाटील हे आंदोलनाच्या वेळी चर्चा सुरू असताना ‘ताज’मध्ये झोपले होते का? असा टोला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. त्यावर विनोद पाटील म्हणाले, विखे हे सरकार आहेत. तुम्ही काहीही शिव्या द्यायच्यात त्या द्या. फक्त समाजाला स्पष्ट करा की, शासन निर्णयात तुम्ही समाजाला काय दिले?

मराठा समाजातील काही अभ्यासकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे त्यांना आता  पोटशूळ उठला आहे. ते जीआरबाबत चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत आहेत. मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील