शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

राज्यभरात अपघातांत तेरा ठार, मुंबई-पुणे मार्गावर तिघांचा बळी; खान्देशातील पाच, नाशकातील चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 4:01 AM

राज्यभरात गेल्या चोवीस तासांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत तब्बल १३ जण ठार झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघे, जळगावातील अपघातात तिघे, नंदुरबारमधील अपघातात दोघे, अकोल्यातील अपघातात एक जण, तर नाशकातील अपघातात चौघे ठार झाले आहेत.

मुंबई : राज्यभरात गेल्या चोवीस तासांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत तब्बल १३ जण ठार झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात तिघे, जळगावातील अपघातात तिघे, नंदुरबारमधील अपघातात दोघे, अकोल्यातील अपघातात एक जण, तर नाशकातील अपघातात चौघे ठार झाले आहेत.मुंबई-पुणे दु्रतगतीमार्गावर बोरज गावाजवळ नादुरूस्त खासगी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने सोमवारी सकाळी सातच्या सुमारास जोरदार धडक दिली.यात ठाण्यातील तिघे ठार, तर सात जण जखमी झाले. साहिल पवार (१६), तानाजी नाईकवाडे (३५), उमेश नाईकवाडे (२२, सर्व रा. ठाणे; मूळ चरणगाव, ता. शिराळा, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. यात ट्रकचालक आहुल बाबू (३८, रा. चेन्नई) जखमी झाला असून, त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच जळगावातील चोपडानजीक वडतीफाटा ते मालचा फाट्यादरम्यान रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात हनुमंत पाटील, केशरसिंग पाटील (रा. माचला, ता.चोपडा) तसेच योगेश सुतार (रा.खंडेराव नगर, जळगाव) हे तिघे जागीच ठार झाले. तर अनिल कोळी व गोकुळ भोई (रा.जळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.दुसºया घटनेत सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास नंदुरबारमधील शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनरदनजीक भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने भूषण गुरव (१७) व शुभम गुरव (१७, दोन्ही रा. प्रकाशा ता. शहादा) हे दोन विद्यार्थी जागीच ठार, तर महेश गुरव (१७) हा जखमी झाला.त्याचबरोबर नाशिक-पुणे रोडवरील अंधशाळा बसस्टॉपजवळ रविवारी मध्यरात्री भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला.त्यात चौघे ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून मृतांमध्ये रिपाइं(ए)च्या युवती जिल्हाध्यक्ष प्रीती अनिल भालेराव यांचा समावेश आहे़ या कारमध्ये एकूण सहा जण होते़ त्यापैकी प्रीती (३५), पूजा भोसले (३०), निशांत बागुल (३०) व सूरज गिरजे या चौघांचा जागीच मृत्यू झाला़ तर कारचालक आनंद मोजाड व रितेश विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत़तसेच, अकोल्यातील पातूर-बाळापूर मार्गावर सोमवारी दुपारी भरधाव ट्रकने समोरून येणाºया दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार श्रीकृष्ण म्हैसने (४४) हे जागीच ठार झाले. या वेळी ट्रक उलटल्याने पायी जात असलेले विष्णू गोविंद घोगे गंभीर जखमी झाले आहेत.औरंगाबादेत दोन अपघातांत चार ठारब्रेक अचानक फेल झाल्याने बीडकडे निघालेल्या भरधाव एसटी बसने तीन रिक्षा, एक दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर ़रिक्षाचालकांसह आणखी एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकात ही भीषण दुर्घटना घडली. संजय म्हसूजी जाधव (४०, रा. बेगमपुरा) आणि बालाजी ढंगारे (४०, रा. सनी सेंटर, पळशी रोड) अशी मृतांची नावे आहेत.दुसºया घटनेत दिवाळीसाठी गावाकडे जाणाºया मित्रांच्या कारला समोरून वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. बीड रोडवरील भालगाव फाट्याजवळ रविवारी रात्री झालेल्या या अपघातात अमित पाटील (३०, रा. मुगाव, ता. निलंगा, जि.लातूर) आणि डॉॅ. हरिकिशन पाटील (३५, जि.बीदर, कर्नाटक) या दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र