शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ‘स्वाइन’ने घेतला तिसरा बळी

By admin | Updated: May 23, 2017 03:46 IST

राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. तर कुर्ला येथील ७२ वर्षीय महिलेलाही स्वाइन फ्लूमुळे जिवाला मुकावे लागले. त्यानंतर आता १६ मे रोजी सायन रुग्णालयात भांडुप टिळकनगर येथील ३० वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मूळची अलाहाबादची असणारी ही महिला एक महिन्यापूर्वी भांडुप येथे राहण्यास आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला ब्रॉन्कायल अस्थमा झाल्याचे निदान झाले होते. शिवाय, तिला काही दिवसांपासून कफ, छातीत दुखणे, श्वसनात अडथळा आणि उलट्यांचाही त्रास होत होता. १३ मे रोजी सायंकाळी तिला सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आले. तेथे तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तींची चाचणी केली असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूचे केवळ ३ रुग्ण आढळले होते, त्यापैकी सर्व बरे झाले होते. मात्र यंदा जानेवारी ते १८ मे दरम्यानच्या कालावधीत मुंबई शहर-उपनगरात ३७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले, तर ३ मृत्यू झाले आहेत. १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात ५००हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १००हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्वाइन फ्लूमुळे घाबरण्याचे कारण नाही. स्वाइन फ्लू बरा होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाणे टाळा आणि गरज पडल्यास तोंडाला रुमाल बांधा. स्वाइन फ्लूवरील लसीकरण आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करा. या साथीदरम्यान गर्भवती, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांत गर्भवतींसाठी लसही उपलब्ध करून दिली जात आहे.