राज्यातील प्रमुख महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याची मालिका सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. परवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेला वाहतुकीचा खोळंबा आणि काल कोल्हापूरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर आज पुणे- इंदूर महामार्गावर येवल्याजवळ वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार येवला शहरातून जाणाऱ्या पुणे–इंदूर महामार्गावर आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः येवल्यातील विंचूर चौफुली आणि फत्तेबुरूज नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी संध्याकाळी आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटल्याने झालेल्या अपघातामुळे सुमारे ३२ तास वाहतूक कोंडी होऊन हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्या टँकरमधून ज्वलनशील प्रोपेलिन गॅसची गळती होत असल्याने प्रशासनाला अपघातग्रस्त टँकर हटवताना खूप खबरदारी घ्यावी लागली होती. मात्र या अपघातामुळे जवळपास दीड दिवस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याने प्रवशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला होता.
मात्र मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर २४ तास उलटून गेले तरी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. काल एक सिमेंट कंटेनर बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर आज बोरघाटामध्ये अनेक वाहने बंद पडल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईपुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक खोळंबली आहे. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
Web Summary : For the third day, Maharashtra highways face traffic disruptions. Pune-Indore highway near Yeola is heavily congested. Mumbai-Pune Expressway experienced delays due to a tanker accident, and the situation is still not resolved. Congestion continues due to breakdowns.
Web Summary : तीसरे दिन भी महाराष्ट्र के राजमार्गों पर यातायात बाधित। येवला के पास पुणे-इंदौर राजमार्ग पर भारी जाम। टैंकर दुर्घटना के कारण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर देरी, स्थिति अभी भी अनसुलझी। खराबी के कारण भीड़ जारी।