गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा 'या' लोकांना मिळणार लाभ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:32 IST2026-03-06T15:25:04+5:302026-03-06T15:32:15+5:30
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा 'या' लोकांना मिळणार लाभ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून ती ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतमजुरांना लाभ मिळणार आहे.
शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा
शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या निर्णयामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी 'स्मार्ट' घोषणांचा वर्षाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले. महाविस्तार एआय : ३० लाख शेतकऱ्यांना 'महाविस्तार' या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल. सुधा मेसेज सेवा : ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी 'वसुधा' ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर मिळेल.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण: महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. डिजिटल सेवा विस्तार: शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.