शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

Belgaum Municipal Corporation Election Results: हे आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार शिलेदार, ज्यांनी बेळगावात फडकत ठेवला मराठी भाषिकांचा भगवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 2:53 PM

Belgaum Municipal Corporation Election Results Update: एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपाच्या लाटेमध्ये एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवत बेळगाव महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा भगवा फडकवत ठेवला आहे.

बेळगाव - बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला आहे. (Belgaum Municipal Corporation Election Results) अनेक वर्षे बेळगाव महानगरपालिका ताब्यात ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला यावेळी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. (maharashtra ekikaran samitee) दरम्यान, एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपाच्या लाटेमध्ये एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवत बेळगाव महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि मराठी भाषिकांचा भगवा फडकवत ठेवला आहे. (These are the four Candidate of the Maharashtra Unification Committee, who kept the saffron of Marathi speakers in Belgaum)

आज लागलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवला. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले. वैशाली भातकांडे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून विजय मिळवला. तर शिवाजी मांडोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून वियज मिळवला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रवी साळुंके यांनी प्रभाग क्रमांक २७ मधून विजय मिळवला. तर बसवराज मोदगेकर यांनी प्रभाग क्रमांक ४८ मधून विजय मिळवला.

बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, एकीकरण समितीच्या पदरात केवळ चार जागा पडल्या आहेत.

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पक्षीय पद्धतीने लढवली गेल्याने या निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने बेळगाव महानगरपालिकेच्या निकालांमध्ये वर्चस्व दिसून आले. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली. अखेर भाजपाने ३६ जागांवर बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसच्या खात्यात १० जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ जागा मिळाल्या. उर्वरित १० जागांवर इतर उमेदवार विजयी झाले. 

टॅग्स :belgaonबेळगावmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समितीPoliticsराजकारण