शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान

By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2025 20:19 IST

आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले.

- संदीप आडनाईक, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटात सर्व काही आलबेल नाही अशा बातम्या येत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे लवकरच काही निर्णय घेणार आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वात बदल दिसतील, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित पवार सोमवारी कोल्हापुरातील दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. 

आमदार रोहित पवार म्हणाले, "ईडीने आजपर्यंत जे आरोप केले आहेत, त्यातील ९९ टक्के आरोप हे खरे नव्हते. या कायद्यामध्ये चांगले बदल होत असतील, तर स्वागतच आहे. विरोधी पक्षांनी जनतेसाठी एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर रस्त्यावर उतरायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही."

पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल

"रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री स्वत:कडे घेतील असे वाटते. बीडमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा वचक कमी पडत आहे", अशी टीका त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर केली. 

वाचा >>लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

"अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्तेतील नेते गोकुळमध्ये राजकारण करत आहेत. कृषिमंत्री कुठेच दिसत नाहीत, त्यांना या अधिवेशनात शोधून काढू", असा इशारा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना दिला. 

तिरंगा रॅली हा राजकीय स्टंट

तिरंगा रॅली काढताना राजकीय स्टंट केला जात आहे, हे अमित ठाकरे यांचे म्हणणे योग्य आहे. देशातील नागरिक केवळ भारतीय सैन्यामुळे सुरक्षित आहेत. जवानांना क्रेडिट देण्यापेक्षा काही नेत्यांना क्रेडिट दिले जात आहे, असेही रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती