'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:43 IST2025-09-14T16:42:31+5:302025-09-14T16:43:02+5:30
NCP Ajit Pawar Group Criticize Sanjay raut: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
मुंबई - संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना आनंद परांजपे म्हणाले की, संजय राऊतांसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची आणि देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही.
शिवसेना उबाठाच्या रॅलीमध्ये, विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे, असे खडेबोलही परांजपे यांनी सुनावले. आजच्या भारत - पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) सदस्य असलेले शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले.