शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात नव्याने काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:51 IST

केंद्र सरकारचे हे दोन्ही प्रकल्प देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत.

ठळक मुद्देनव्याने काही तरतुद केली नसली तरीही दोन्ही प्रकल्पांचे काम व्यवस्थित सुरू मागील वर्षी मेट्रोसाठी १७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतुद

पुणे: मेट्रो व स्मार्ट सिटी या केंद्र सरकारच्या दोन महत्वाच्या प्रकल्पासाठी मागील वर्षी केली आहे तीच तरतुद करण्यात आली असल्याचे या दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने काही तरतुद केली नसली तरीही दोन्ही प्रकल्पांचे काम व्यवस्थित सुरू असल्यामुळे केंद्रीय नगरविकास खात्याकडे दोन्ही प्रकल्पांसाठीचे आर्थिक तरतुद करण्यात आल्याची माहिती मिळाली.केंद्र सरकारचे हे दोन्ही प्रकल्प देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत. मात्र अंदाजपत्रकात त्यांच्यासाठी कसलीही आर्थिक तरतुद केलेली दिसत नाही. स्मार्ट सिटी योजना देशातील १०० शहरांमध्ये सुरू आहे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच काही खासगी कंपन्यांचे साह्य यांच्या एकत्रित रकमेतून हा प्रकल्प राबवण्यात येतो. केंद्र सरकार त्यासाठी निधी देत असते. ती तरतुद अंदाजपत्रकात केलेली दिसत नाही. मेट्रो चेही तसेच आहे. पुणे, नागपूर या राज्यातील दोन महत्वाच्या शहरांशिवाय देशातील अन्य काही राज्यांमधील शहरांमध्येही मेट्रो चे काम सुरू आहे. मेट्रोसाठी खासगी वित्तीय संस्थांकडून निधी उभा करण्यात आला तरी केंद्र सरकारही बरेच मोठे आर्थिक साह्य करत असते. त्यासाठीही अंदाजपत्रकात काही स्वतंत्र तरतुद दिसत नाही. याबाबत काही अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की यापुर्वी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे तरतुद केली जात होती. मात्र त्यामुळे ज्यांचे काम सुरू आहे त्यांना व ज्यांचे सुरू नाही त्यांनाही पैसे मिळत असत. काम सुरू नसले की ते पैसे खर्च होत नसत. त्यामुळे मागील वर्षीपासून अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश केंद्रीय नगरविकास खात्यात करण्यात आला व या खात्याकडे त्यांच्यासाठीची आर्थिक तरतुद करण्यात येते अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्यामुळे या खात्याकडून ज्यांचे काम सुरू आहे, ज्यांना निधीची गरज आहे अशांनाच निधी पुरवला जातो. त्यामुळे त्यांच्या कामाची गती वाढते व पैसेही खर्च होतात.मागील वर्षी मेट्रोसाठी १७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतुद केली होती. ती नंतर वेगवेगळ्या शहरांमधील मेट्रो प्रकल्पांना त्यांच्या गरजेप्रमाणे वितरीत करण्यात आली. यावर्षी स्वतंत्रपणे काही नोंदवण्यात आले नसले तरी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे अशी माहिती मेट्रो मधील अधिकाºयांनी दिली. ..........स्मार्ट सिटी योजनेसाठी साठी मागील वर्षी अंदाजपत्रकात होती तेवढी तरतुद याहीवर्षी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही काम अडणार नाही. ज्या शहरांचे काम सुरू आहे, त्यांना निधी वितरीत करण्यात येईल.कुणाल कुमार, केंद्रीय सचिव, स्मार्ट सिटी प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोCentral Governmentकेंद्र सरकारUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन