शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ५0 टक्के उपस्थिती नसेल तर अनुदान नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:10 IST

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शाळेला २ लाखांचे अनुदान

अकोला: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असून, त्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ७0 टक्के तर अपंग विद्यार्थ्यांची ५0 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या निकषानुसार विद्यार्थी संख्या नसेल, तर संबंधित शाळेला अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.अनुदानाच्या माध्यमातून शासन निधीचा वापर करणार्‍या शैक्षणिक संस्थांकडून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुरेशा मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जात नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होत चालली आहे. ही बाब लक्षात घेता, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. अल्पसंख्याक विभागाच्या निकषानुसार मान्यताप्राप्त शाळा-महाविद्यालयात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांंची ७0 टक्के, तर अपंग विद्यार्थ्यांची किमान ५0 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. विद्यार्थी पटसंख्या गृहीत धरूनच दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. पात्र शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वीकारले जाणार आहेत. प्रस्तावांच्या छाननीसाठी जिल्हानिहाय निवड समित्या!या योजनेंतर्गत प्राप्त होणार्‍या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात उच्चस्तरीय निवड समित्या गठित करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्हय़ात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समित्यांमध्ये सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि व्यवसाय शिक्षण विभागाचे सहसंचालक या समित्यांचे सदस्य म्हणून, तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी राहणार आहेत.