शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन आठवडे पाऊस नाही; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:28 IST

६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात १२ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे आभाळाकडे तोंड लावून बसलेल्या बळीराजाला आणखी दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हवामान विभागाने येत्या १२ जूनपर्यंतच्या पावसाचा अंदाज गुरुवारी (दि. ३०) जाहीर केला. २० मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल थांबलेली आहे. केरळमध्येही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र, स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वळवाच्या पावसाची पाठदेशात १ मार्च ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या पावसात २४ टक्के घट झाली आहे. देशात या काळात सरासरी १२६.६ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत देशभरात सरासरी ९६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उत्तर पश्चिम भारतात ७८ मिलिमीटर (२९ टक्के घट), मध्यभारतात ३१.७ (१७ टक्के घट), दक्षिण भारतात ६१.८ (४८ टक्के घट) आणि ईशान्य भारतात ३१२.५ मिलिमीटर (१२ टक्के घट) पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भweatherहवामान