बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही आमंत्रण नाही :खासदार संभाजीराजे भोसले यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 17:26 IST2018-08-04T17:25:24+5:302018-08-04T17:26:38+5:30
संभाजीराजे आणि उदयनराजे यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगत असले तरी त्या प्रकारचे कोणतेही आमंत्रण आले नसल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुण्यात स्पष्ट केले.

बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही आमंत्रण नाही :खासदार संभाजीराजे भोसले यांचे स्पष्टीकरण
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस href='http://www.lokmat.com/topics/maratha-reservation/'>मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटनांची चर्चा करण्यास करण्याची तयारी मुख्यमंत्री दाखवतात. संभाजीराजे आणि उदयनराजे यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगत असले तरी त्या प्रकारचे कोणतेही आमंत्रण आले नसल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुण्यात स्पष्ट केले.
पुण्यात ते एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी मी २००७सालापासून गेली दहा वर्ष मराठा समाजाचा समन्वयक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेत्रित्व करण्यापेक्षा समन्वयक म्हणून काम करण्यास आवडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांसोबत ज्या काही बैठका होतील त्या सर्वांसाठी खुल्या असल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला मराठा समन्वयक, नेते उपस्थिती राहू शकतील. मात्र ही बैठक थेट बघण्याची सुविधा हवी असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याने मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येचा पर्याय निवडू नये अशी विनंती त्यांनी केली. आपण शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे वंशज आहोत. आपला समाज लढवैय्या आहे. त्यामुळे कोणीही आत्महत्येचा पर्याय स्वीकारू नये असे आवाहन त्यांनी केले.