शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 20:56 IST

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते...

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक

पुणे: ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते. परंतु,काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक आहे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बैठकीस खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण,शहराध्यक्ष चेतन तुपे,आमदार जयदेव गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.अजित पवार यांनी निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले,केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळी भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. तसेच अनेक अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.राज्य शासनाकडून प्रत्येक गोष्टीत अट घातली जात आहे.त्यामुळे हे सरकार अटीचे सरकार आहे,अशी टीका करत अजित पवार म्हणाले, सरकारकडून आरक्षणाला अट,चारा छावण्यांना अट,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगांबाबत, ईमेल व डिजिटल कॅमेरा विषयी केलेले विधान हास्यास्पद असून ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही न पटणारे आहे.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चर्चा केली. दुष्काळ बाधितांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपा