क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 04:00 PM2024-01-28T16:00:16+5:302024-01-28T16:00:45+5:30

निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगेंनी मान्य केलेल्या मसुद्यावर मत मांडले आहे.

There is no guarantee that a curative petition will be decided in Our Maratha favor; Reactions of former judge Tanaji Nalawade on Maratha Reservation morcha success jarange patil | क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया

क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या रविवारच्या सरकारच्या तोडग्यावर संभ्रमावस्था पसरू लागली आहे. आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकार आरक्षण मिळण्यावर ठाम आहेत, तर विरोधक आणि कायदेतज्ञ यात फसवणूक झाल्याचे बोलत आहेत. जे इतर आरक्षणाच्या नियमांमध्ये आहे तिच आश्वासने मराठा आरक्षणाच्या मसुद्यात देण्यात आल्याचे विरोधक सांगत आहेत. आता कोल्हापूरच्या निवृत्त न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगेंनी मान्य केलेल्या मसुद्यावर मत मांडले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतून मराठा समाजाच्या हाती काहीच पडलेले नाही. पंधरा दिवस वेट अँड वॉच भूमिका असेल. अनेकांना 16 फेब्रुवारीच का  हा प्रश्न समाजाला पडणे साहजिक आहे. कारण जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तर यातून काहीही मिळणार नाही. उलट निवडणुकीत या अधिसूचनेचे भांडवल केले जाणार आहे, असे नलवडे यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने  लागण्याची जराही शाश्वती नाहीय, असेही नलवडे म्हणाले आहेत. याचबरोबर कोल्हापूरचा शाहू पुरस्कार मनोज जरांगे यांना देण्याची मागणी देखील नलवडे यांनी केली आहे.

Web Title: There is no guarantee that a curative petition will be decided in Our Maratha favor; Reactions of former judge Tanaji Nalawade on Maratha Reservation morcha success jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.