शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 6:44 PM

मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल़..

ठळक मुद्देकोकणात अतिवृष्टीचा इशारा : चार दिवसानंतर पाऊस होणार कमीमराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस़ 

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. पुढील चार दिवस कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल़. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात अनुकुल वातावरण असल्याने १५ जुलैनंतर मराठवाडा व विदर्भात जोरदार पाऊस होण्याची आशा असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपि यांनी सांगितले़. डॉ़ कश्यपि यांनी सांगितले की, कोकण, गोव्यात पुढील ४८ तासात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे़. ११, १२ व १३ हे तीन दिवस कोकणात सर्वदूर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असून नंतर उत्तर कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होईल़. मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़.मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल़. त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होईल़ विदर्भातही पुढील चार दिवस काही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़. यंदा मॉन्सून उशिरा आल्याने सर्वत्रच पाऊस उशिरा सुरु झाला़. मराठवाड्यातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये नेहमीच उशिरा पाऊस होतो़. पण, यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने आणखी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे़. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालचा उपसागरात मॉन्सूनच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण नाही़. त्यामुळे येत्या १५ जुलैनंतर मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले़. गेल्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ९०, चांदगड, ओझरखेडा ८०, आजरा, हरसुल, पेठे, शाहुवाडी ७०, जावळी मेधा, पन्हाळा ६०, दहीगाव, राधानगरी, सुरगाणा ५० मिमी पावसाची नोंद झाली़. याशिवाय अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़. मराठवाड्यात औंढा नागनाथ, कळमनुरी ५०, हिमायतनगर, माहूर ४०, हदगाव, हिंगोली, किनवट २०, आंबेजोगाई, भुम, कळंब, कन्नड, लातूर, सेनगाव, तुळजापूर, वाशी १० मिमी पाऊस झाला़. विदर्भात बुलढाणा ६०, देसाईगंज, कोर्ची, कुरखेडा, शेगाव ४०, अकोला, भामरागड, ब्रम्हपुरी, एटापल्ली, नागभिड, नांदुरा, रिसोड, सेलू, तिवसा ३० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला़१० ते १३ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बºयाच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस इशारा : १० जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधाऱ ११ ते १३ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ .............गेल्या २४ तासात शिरगाव, ताम्हिणी २५०, दावडी २००, डुंगरवाडी १९०, जव्हार १८०, भिरा, मंडणगड, लोणावळा (कृषी) १७०, बेलापूर, खोपोली १५०, माथेरान, पेण, महाबळेश्वर १४०, अम्बोणे,  वळवण, पौड, उल्हासनगर, वाडा १३०, कोयना (नवजा), पोलादपूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, विहार, तुलसी ११०, विक्रमगड, भोर, शिरोटा १०० मिमी पाऊस झाला होता़

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाRainपाऊस