शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 02:59 IST

घरीच होते बाळंतपण; वाड्यावस्त्यांवर जाऊन गर्भवतींची नोंद

- राजानंद मोरे पुणे : रुग्णालयात जाऊन सुरक्षित प्रसूती करण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांत तब्बल १५ पटींनी वाढले आहे. मात्र, अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १० हजार प्रसूती जोखीम पत्करून रुग्णालयाबाहेर होत असल्याची स्थिती आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसूती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते.केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून घरगुती प्रसूतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर जाऊन गर्भवती महिलांची नोंद ठेवली जाते. त्यांना रुग्णालयांमध्ये तपासणीला येण्यासाठी आग्रह केला जातो. खासगी रुग्णालयांकडूनही गर्भवती महिलांची माहिती संकलित केली जाते. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०१०-११ या वर्षात महाराष्ट्रात घरगुती प्रसूतीचे प्रमाण सुमारे १ लाख ५९ हजार एवढे होते. त्यानंतर हे प्रमाण वेगाने कमी होत गेले आहे.वर्ष २०१२-१३ मध्ये घरगुती प्रसूती चे प्रमाण पहिल्यांदाच एक लाखाच्या खाली आहे. यावर्षी सुमारे ६७ हजार महिलांची प्रसूती रुग्णालयाबाहेर झाली. मागील चार-पाच वर्षांमध्ये हा वेग पुन्हा मंदावल्याचे चित्र आहे. २०१६-१७ मध्ये सुमारे १५ हजार प्रसूती घरी झाल्या.पुढील चार वर्षात त्यामध्ये केवळ चार हजारांची घट झाली. २०१०-११ नंतर पाच वर्षात घरगुती प्रसूतीचे प्रमाण सुमारे सव्वा लाखाने कमी झाले होते. २०१९-२० मध्ये जानेवारी अखेरपर्यंत १३ लाख ८२ हजार महिलांनी रुग्णालयात प्रसूतीला पसंती दिली. तर घरगुती प्रसूती चे प्रमाण ९ हजार ८६३ एवढे आहे. अजूनही ग्रामीण भागातील अनेक कुटूंबांमध्ये घरीच प्रसूती करण्यासाठी आग्रह केला जातो. काही ग्रामीण-आदिवासी भागामध्ये पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. काही वेळी प्रसूती साठी वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यात घरगुती प्रसूतीचे प्रमाण दहा हजाराच्या जवळपास आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी