"माझ्यात व पटोले यांच्यात मतभेद नाहीत, एकत्र बसून विचारांनी होतात निर्णय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 15:21 IST2021-03-20T14:43:09+5:302021-03-20T15:21:25+5:30
Balasaheb Thorat And Nana Patole : राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले.

"माझ्यात व पटोले यांच्यात मतभेद नाहीत, एकत्र बसून विचारांनी होतात निर्णय"
संगमनेर (अहमदनगर) - नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात. त्यात मतमतांतरे असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. असे काहीही नाही. असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांदरम्यान काही ठिकाणी पदाधिकारी निवडीचे वादही त्यांच्यासमोर आले आहेत.
महसूलमंत्री थोरात हे शनिवारी ( दि. २०) त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघात आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले. थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा असल्याने काही जण बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले.
"आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप, ठाकरे सरकारच्या अवतीभवती फिरताहेत धागेदोरे"https://t.co/eKC7TXyPVR#SachinVazeArrested#sachinvazecase#RaviRana#MaharashtraGovernment#Politics#MumbaiPolicepic.twitter.com/1KtN4lenPN
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2021
आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले...https://t.co/vS5i8I4DZ2#AshishShelar#ThackerayGovernment#BJP#Shivsena#ParambirSingh#MumbaiPolicepic.twitter.com/F7WEGHk203
— Lokmat (@MiLOKMAT) March 17, 2021