महाराष्ट्रातील शाळांत महिलाराज! पुरुषांचे प्रमाण कमी; देशात सध्या १ कोटीच्या जवळपास शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:46 IST2025-01-08T14:45:41+5:302025-01-08T14:46:11+5:30

भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांत महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत ५३.३ टक्के इतकी झाली आहे.

There are more women in schools in Maharashtra, less men; There are currently around 1 crore teachers in the country | महाराष्ट्रातील शाळांत महिलाराज! पुरुषांचे प्रमाण कमी; देशात सध्या १ कोटीच्या जवळपास शिक्षक

महाराष्ट्रातील शाळांत महिलाराज! पुरुषांचे प्रमाण कमी; देशात सध्या १ कोटीच्या जवळपास शिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या शाळांमधीलशिक्षकांत महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत ५३.३ टक्के इतकी झाली आहे. २०२३-२४ साठी यूडीआयएसई प्लसच्या अहवालानुसार देशात शिक्षिकांची ही आतापर्यंतची  सर्वाधिक आकडेवारी आहे. २०१८-१९ मध्ये शाळांत पुरुष शिक्षक अर्ध्यापेक्षा अधिक होते. तेव्हा ९४.३ लाख शिक्षकांपैकी ४७.१६ लाख (५०.०१ टक्के) पुरुष होते. सध्या भारतात पुरुष शिक्षकांची संख्या ४५ लाख ७७ हजार २६, तर शिक्षिकांची संख्या ५२ लाख ३० हजार ५७४ आहे. देशात सध्या ९८ लाख ७६ हजार शिक्षक आहेत. 

केरळमध्ये सर्वाधिक ८० टक्के शिक्षिका: केरळ, पंजाब आणि हरयाणामध्ये शिक्षिकांची संख्या अनुक्रमे ८० टक्के, ७६ टक्के आणि ६४.७३ टक्केपर्यंत आहे, तर राजस्थानसारख्या राज्यांमध्ये सध्याही पुरुष शिक्षकांची संख्या अधिक आहे. हे प्रमाण ६० टक्के इतके आहे. केरळमध्ये सरकारी शाळांमध्ये ७८ टक्के महिला शिक्षक आहेत, तर तामिळनाडू (६७ टक्के) आणि दिल्लीत (६१ टक्के)  शिक्षिका आहेत. 

उच्च शिक्षणात पुरुषांचा दबदबा

  • महिलांची वाढती संख्या ही शालेय शिक्षणापर्यंत मर्यादित आहे. उच्च शिक्षणात मात्र पुरुषांचा दबदबा कायम आहे. 
  • २०२१-२२ च्या उच्च शिक्षणावर आधारित भारतीय सर्वेक्षणानुसार प्राध्यापिकांची संख्या ४३ टक्के, पुरुषांची संख्या ५७ टक्के आहे.
  • २०१८-१९ मध्येही महिलांचे प्रमाण कमी होते.


खासगी शाळांत शिक्षिका किती वाढल्या?

  • खासगी शाळांत महिला शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१८-१९ मध्ये ४९.४७ लाख सरकारी शाळेतील शिक्षकांमध्ये २८.१८ लाख पुरुष आणि २१.२९ लाख महिला होत्या.
  • २०२३-२४ मध्ये महिलांच्या संख्येत जवळपास ६ टक्के वाढ झाली आहे. २२.६५ लाख महिला सरकारी शाळांमध्ये शिकवत होत्या, तर २७.७२ लाख पुरुष शिक्षकांचे प्रमाण होते.
  • खासगी शाळांत महिला शिक्षकांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. २०१८-१९ पासून २०२३-२४ पर्यंत सर्व वर्षांत खासगी शाळांत महिला शिक्षकांची संख्या अधिक राहिली आहे.

Web Title: There are more women in schools in Maharashtra, less men; There are currently around 1 crore teachers in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.