...तर आधी भोकरदन सांभाळा!
By Admin | Updated: February 9, 2017 00:24 IST2017-02-09T00:24:06+5:302017-02-09T00:24:06+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जावर, आत्महत्येसारख्या गंभीर व संवेदनशील विषयांवर बेछूट विधाने करणाऱ्यांनी आधी भोकरदन सांभाळावे, अशी टीका करीत

...तर आधी भोकरदन सांभाळा!
नांदेड : शेतकऱ्यांच्या कर्जावर, आत्महत्येसारख्या गंभीर व संवेदनशील विषयांवर बेछूट विधाने करणाऱ्यांनी आधी भोकरदन सांभाळावे, अशी टीका करीत, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला़
थेट नामोल्लेख न करता खा़ चव्हाण म्हणाले, ‘सत्ताधारी नेत्यांना अहंकाराने जखडले आहे़ शेतकऱ्यांचे प्रश्नही विनोदी अंगाने बोलण्याचा बेमुरवतपणा त्यांनी चालविला आहे़ लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये नांदेडसह मराठवाड्यातील जनतेने काँग्रेसला भक्कम साथ दिली़ भाजपा नेते, मंत्री व सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये पालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली़ जिल्हा परिषदेतही तेच घडणार आहे़ त्यामुळे नैराश्यातून बेछूट विधाने करण्याचा आजार सत्ताधारी नेत्यांना जडला आहे़ दोन-अडीच वर्षांत घोषणांशिवाय काही दिले नाही़ योजनांची नावे बदलली़, परंतु प्रत्यक्षात शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, नोकरदार अशा कोणत्याही घटकाला लाभ देणारे धोरण नाही़ कर्जमाफी दिली नाही़ एक टक्का शेतकऱ्यांना शे-पाचशेची व्याजमाफी देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले़ त्यामुळे बाष्कळ बडबड करणाऱ्या भाजपा नेत्यांना जनता धडा शिकवेल़